Search Options
|
IREF® - Indian Real Estate Forum > Real Estate in India > Real Estate Pune > रिंग रोड अडकला मंत्रालयातच


Reply
 
LinkBack Thread Tools Search this Thread
Old March 27 2013, 07:46 AM   #1
Member
 
Join Date: May 2009
Posts: 289
Likes Received: 31
Likes Given: 11
Icon15 रिंग रोड अडकला मंत्रालयातच

पुणे - "रिंग रोडच्या कामाला गती देणार', "रिंगरोड लवकरच मार्गी लागणार' अशा घोषणा होत असल्या, तरी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून वर्तुळाकार रस्त्याचा हा प्रकल्प कणभरही पुढे सरकला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. रिंग रोडच्या प्रकल्प अहवालाचे काम अमेरिकी कंपनीला देण्यास मान्यता मागणारी फाइल राज्याच्या नगररचना खात्यात केवळ धूळ खात पडून आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्हा यांना वरदान ठरणारा सहापदरी रिंग रोड आणि रेल्वे प्रकल्प झाल्यास शहर परिसरातील वाहतुकीचा ताण 40 टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे. तसेच रिंग रोडमुळे वेळेचीही बचत होणार आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून या प्रकल्पाबाबत केवळ "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' असे होत आहे. प्रशासकीय स्तरावर गेल्या सात महिन्यांत हा प्रकल्प पुढे सरकलेलाच नाही.

राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यातून एईकॉम एशिया या अमेरिकेतील कंपनीची निवड झाली आहे. ती कंपनी मुंबईतील पेंटॅकल कन्सल्टंट या कंपनीच्या मदतीने प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. त्या कंपनीला सुमारे एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी कामाचा लेखी आदेश म्हणजे "वर्कऑर्डर'ही महामंडळाने तयार केली आहे; मात्र वर्कऑर्डर देण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच नगररचना खात्याकडे परवानगीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. महामंडळही त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. कोणतेही कारण न देता परवानगी न मिळाल्यामुळे संबंधित कंपनीला प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरवातही करता आलेली नाही. वर्कऑर्डर मिळाल्यावर कंपनी एका वर्षात दोन टप्प्यांचा प्रकल्प अहवाल तयार करणार. त्यानंतर त्याला मंजुरी मिळणार, आर्थिक तरतूद होणार व त्या नंतर सर्व काही सुरळीत पार पडले, तर रिंग रोडचे काम सुरू होणार, असा त्याचा प्रवास असेल. या प्रक्रियेला किती काळ लागेल, याचे उत्तर कोणताही शासकीय अधिकारी सध्या तरी देऊ शकत नाही.

रिंग रोडचे प्रारूप अस्पष्ट
नियोजित रिंग रोडचे प्रारूप या पूर्वी जाहीर झाले होते, मात्र त्यात बदल झाला. आता प्रकल्प अहवाल तयार झाल्यावरच रिंग रोडचा अंतिम आराखडा निश्‍चित होऊ शकतो. त्यामुळे नियोजित रिंग रोड कसा असेल, हे सध्या तरी अस्पष्ट आहे. मात्र, शहरालगतच्या वाड्यावस्त्यांजवळून रिंगरोड हमखास जाणार, असे सांगत जमिनींचे भाव सध्या गगनाला भिडविण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मान्यता वेळेत मिळाली असती तर...?
प्रकल्प अहवाल करण्यासाठीची वर्कऑर्डर गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच संबंधित कंपनीला मिळाली असती, तर आणखी पाच महिन्यांत प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर झाला असता. त्यानंतर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन भूसंपादनाच्या कामाला प्रारंभ झाला असता. त्याचदरम्यान रस्त्याच्या चारपैकी पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला असता. मात्र, आता संबंधित कंपनीला वर्कऑर्डर दिल्यावर एक वर्षाने प्रकल्प अहवाल सादर होणार व त्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे.

http://online2.esakal.com/NewsDetail...ंग रोड अडकला मंत्रालयातच
 
Reply
Thread Tools Search this Thread
Search this Thread:

Advanced Search
Posting Rules
You may not post new threads
You may not post replies
You may not post attachments
You may not edit your posts

BB code is On
Smilies are On
[IMG] code is On
HTML code is Off
Trackbacks are Off
Pingbacks are Off
Refbacks are Off

Join IREF Now!    
Related Threads
Noida Authority Land Scam :: कैटिगरी बदल लगाया करोड़ों का चूना
पांच हजार आवंटियों पर लाखों का अतिरिक्त भì
चार वर्षांत घरांच्या किमतींनी गाठला कळस
सुभाष नगर में बनेगी तीन मंजिला अंडरग्राउं
हिंडन नहर IP to Noida पुल नवंबर तक तैयार हो जाएगा


Tags
रिंग, रोड